पशुपालकांना रोहयोप्रमाणे मजुरी द्यावी - प्रकाश आंबेडकर

पशुपालकांना रोहयोप्रमाणे मजुरी द्यावी -  प्रकाश आंबेडकर

संगेवाडी (ता. सांगोला) -  चारा छावणीतील पशुपालकांना रोजगार हमी योजनेप्रमाणे मजुरी द्यावी. दुष्काळात शेतकऱ्यांना छावणीवरील रात्रंदिवस कामाची मजुरी मिळाल्यास दिलासा मिळेल, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी भागातील मेथवडे, मांजरी येथील चारा छावण्याची आंबेडकर यांनी आज पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी जनावरांना कोणत्या पद्धतीचा आणि पुरेसा चारा दिला जातो का, एवढ्या उन्हात शेतकरी कोठे राहतो, काय करतो, पाण्याची व्यवस्था कशी आहे, पशुखाद्य दिले जाते का, जनावरांची आरोग्य तपासणी केली जाते, का याबाबत त्यांनी शेतकरी व पशुपालकांकडून माहिती घेतली. आधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे मेथवडे येथील छावणीमध्ये नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. 

चारा छावणीतील जनावरे सांभाळण्याऱ्या पशुपालकांना मजुरी द्यावी आणि इतर मुद्यांबाबत ११ मे रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत आपण प्रयत्न करू, असेही आंबेडकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com