
रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलीय. या समाधीला कोणताच ऐतिहासिक पुरावा नसल्याचं भारतीय पुरातत्व खात्यानंही स्पष्ट केलंय. त्यामुळे ३१ मे पर्यंत ही समाधी हटवावी असं संभाजीराजेंनी पत्रात म्हटलंय. आता यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही प्रतिक्रिया दिलीय. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं इंद्रजित सावंत म्हणाले.