वाल्मीक कराड आता ६ महिने तुरुंगातच? जामीन मिळणं कठीण, कोर्टाने सुनावलीय १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला बीड जिल्हा विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.
Walmik Karad
Walmik KaradEsakal
Updated on

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडची रवानगी पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय. बीड जिल्हा विशेष न्यायालयाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याला तुरुंगात रहावे लागणार आहे. कराडने ३१ डिसेंबरला सीआयडीसमोर शरणागती पत्करली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. सुरुवातीला त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. मात्र नंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यातही कराडला आरोपी करण्यात आलं. आता या प्रकरणी कराडला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.

Walmik Karad
Walmik Karad CCTV : वाल्मिक कराड, सुदर्शन अन् प्रतीक घुले एकत्र! खंडणीच्या दिवशीचं फुटेज आलं समोर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com