esakal | यंदा पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचंय? ..जरा थांबा; आधी वाचा ही महत्वाची बातमी..  
sakal

बोलून बातमी शोधा

trekking

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रेकर्स आणि पर्यटकांनी पावसाळी भटकंती टाळावी. घरीच बसून सुरक्षित राहा, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघातर्फे करण्यात आले आहे. 

यंदा पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचंय? ..जरा थांबा; आधी वाचा ही महत्वाची बातमी..  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: पावसाळा सुरू झाला की, सर्वांना ट्रेकिंग वेध लागतात. पावसाळ्यात सह्याद्रीचे फुललेले सौदार्य पाहण्यासाठी प्रत्येकांच्या मनात ओढ निर्माण होते. आपोआपच पाय सह्याद्रीतील गड-किल्ले पाहण्यासाठी वळतात. परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रेकर्स आणि पर्यटकांनी पावसाळी भटकंती टाळावी. घरीच बसून सुरक्षित राहा, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघातर्फे करण्यात आले आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्याचे संकट टळले नाही. अशा स्थितीत पावसळी भटकंती करणे योग्य नाही. त्यामुळे या वेळी सर्वांनी भटकंतीचे नियोजन स्थगित करा. अजून काही महिने भटकंतीसाठी संयम राखा. जेथे अजून कोरोना प्रादुर्भाव झालेला नाही अशा  दुर्गम भागात भटकंची केल्यास तेथे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा: सरकारने शाळेची घंटा वाजवू नये; मुलांना संसर्ग होण्याची पालकांमध्ये भीती..

दोन - तीन महिने पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, सातारा, कोल्हापूर  येथे पर्यटकांनी जाऊ नये,असे गिर्यारोहक महासंघाकडून सांगण्यात येत आहे. तसेच ठाणे, पुणे तसेच आणखी  काही जिल्ह्यात  जिल्हाधिकारांनी पावसाळी भटकंती बंदीचा जीआर काढून भटकंतीला चाप लावला आहे. अगदीच भटकंती करण्यास गेल्यास जवळच्या ठिकाणी तेथील स्थानिकांशी संपर्क येणार याची काळजी घ्यावी. कारण दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सुविधाचा अभाव आहे, अशा कडेकपारीच्या भागात  कोरोना प्रादुर्भाव झाला तर त्यासाठी आवश्यक सुविधा मार्गी लावणे कठिण आहे. 

त्यामुळे भटकंती टाळावी, असे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले पावसाळ्यात अगदीच भटकंतीची इच्छा झाली तर  केवळ ज्या ठिकाणची माहिती आहे तेथेच एक दिवसापुरता जावे. अनोळखी स्थळी जाऊ नये. गडाच्या तटबंदी, कडे यापासून दूर राहावे. तसेच पावसाळ्या अनेक वाटा निसरड्या होतात. त्याबाबतही दक्षता घ्यावी, कोरोनाच्या परिस्थितीत रेस्क्यू करणे कठिण आहे. त्यामुळे भटकंती टाळावी, अशी झिरपे यांनी विनंती केली. 

कोरोना पश्चात भटकंतीला जाताची मार्गदर्शक सूचना कोरोना प्रादुर्भाव टळल्यावरही भटकंती व ट्रेकिंगसाठी बाहेप पडल्यास विशेष काळजी घेणे  गरजेचे आहे. कोरोनाच्या पश्चात बाहेर भटकंती गेल्यास ग्रामस्थांशी संपर्क टाळावा, स्वतःच्या वस्तब स्वतःसाठीच वापरा, पाणी, खाणं तसेच स्वतःचे ताट, वाटी, कप, चममा स्वतः सोबत ठेवा. कागद्या प्लेट वापरायचे ठरले तरी ते वाटप करताना, त्याची विल्हेवाट लावताना अनेकांसी संपर्क येतो. त्यामुळे स्वतःचे वस्तू वापरण्यावर भर द्यावा. ट्रेकला जाताना 15 जणांचा समूह असावा. शक्यतो हा ग्रुप एकमेकांच्या परिचयाचा असावा. ग्रुपमधील प्रत्येक सदस्याची वैद्यकीय माहिती प्रमुखास माहिती असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा: अरे वाह! राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात होणार प्लाझ्मा थेरपी; 17 कोरोनामुक्त रुग्णांनी केला प्लाझ्मा दान.

गरज पडल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र मागवून घेणे. शक्य झाल्यास ग्रुपमध्ये एखादा डॉक्टर असावा. भटकंतीमध्ये सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागला तर त्या सदस्याने स्वतःहून माघार घ्यावी. जेणेकरून संसर्ग टाळेल. गर्दीची भटकंतीची ठिकाणे टाळा, कोणाच्याही घरी मुक्कामी थांबू नका, प्रथमोपचाराची पेटी प्रत्येक ग्रुप बरोबर ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक गावकऱ्यांनी, प्रशासनाने भटकंतीसाठी आलेल्या प्रत्येका नोंद करून ठेवावी.

want to go for trekking but wait read full story