वर्धा गर्भपात प्रकरणाचा SITद्वारे होणार तपास - पोलीस अधीक्षक

तपासातून अनेक महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता
SP Prashant Holkar
SP Prashant Holkar

आर्वी (जि. वर्धा) : वर्ध्यातील आर्वी (Aarvi) येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर (Prashant Holkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, याप्रकरणातील ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी आरोपी महिला डॉक्टरनं आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानुसार आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं आहे. (Wardha abortion case to be probed by SIT Information of Superintendent of Police)

SP Prashant Holkar
वर्धा : गर्भपाताचं रॅकेट उद्ध्वस्त; आढळली ५४ हाडे, ११ कवट्या!

पोलीस अधीक्षक होळकर म्हणाले, आरोपी डॉक्टरला ताब्यात घेऊन त्यांचा पीसीआर घेण्यात आला आहे, यामध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात येत आहे. यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सात जणांचा समावेश आहे.

प्रकरणाचा कसा झाला उलगडा?

काल १२ तारखेला खबऱ्यांकडून इन्स्पेक्टर पितूरकर यांना माहिती मिळाली की, त्यांच्या घरामागे जो साधा घरगुती गोबर गॅसचा प्लान्ट आहे त्यामध्ये काही अर्भकांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यानुसार खोदकाम करण्यात आलं, तिथं अर्भकांची काही अवशेष सापडली. इथल्या सरकारी डॉक्टरांना बोलावून ही अवशेषं जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी दिलेल्या लेखी अहवालानुसार यामध्ये ११ कवट्या ५४ हाडं सापडली आहेत.

या गोष्टी केल्या जप्त

आम्ही दवाखान्याची नोंदवही जप्त करण्यात आली आहे. यामध्ये किती जणांचे कायदेशीर गर्भपात झाले याची माहिती आहे. तसेच चाचण्यांसाठी कोण कोण दवाखान्यात येऊन गेलं याचीही नोंद घेण्यात आली आहे. गर्भपाताच्या नोंदवहीत सध्या आठ लोकांची नाव आहेत. पण उर्वरित तीन कवट्या कोणाच्या आहेत आणि त्यांची नोंद का केली गेली नाही. याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात प्राथमिक चौकशीनुसार अर्भकांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया चुकीची असल्याचं दिसून आलं आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रीय पूर्ण करुन पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी अधीक्षक होळकर यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com