

Vidarbha News
esakal
वर्धा: गोरस भांडार प्रकरणात झालेल्या प्रशासकीय कारवाईमुळे संस्था, शेतकरी, गोपालक, दूध उत्पादक तसेच कर्मचाऱ्यांचे झालेले आर्थिक व सामाजिक नुकसान लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि संस्थेला झालेल्या नुकसानीची योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.