सावधान..! अशोक खरातचे किंवा कोणताही व्हिडिओ लगेच डिलिट करा, नाहीतर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा! ‘BNS’ कलम २९४(२) नुसार होईल २ ते ४ वर्षांची शिक्षा

भोंदूबाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत. सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेकजण आवर्जून शोधून हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. ते व्हिडिओ इतरांनाही शेअर केले जात आहेत.
ashok kharat cctv videos

ashok kharat cctv videos

esakal

Updated on

सोलापूर : भोंदूबाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत. सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेकजण आवर्जून शोधून हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. ते व्हिडिओ इतरांनाही शेअर केले जात आहेत. अशा व्यक्तींवर किंवा सोशल मीडियावरून व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

एखाद्याची बदनामी होईल किंवा दोन जाती-धर्मांत तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडेल, असे व्हिडिओ, फोटो, मेसेज सोशल मीडियातून प्रसारित करणे गुन्हा आहे. अशोक खरात याच्या कार्यालयातील अनेक व्हिडिओंमध्ये पीडित महिलांचे चेहरे दिसतात. ते व्हिडिओ, फोटो दुसऱ्यांना प्रसारित केल्यास त्यातून त्यांची बदनामी होत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पीडितांच्या नातेवाइकांच्या तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये येत आहेत. त्यामुळे सायबर पोलिसांनी तरुणांना आपल्यावर गुन्हा दाखल होईल, असे कृत्य न करण्याचा सल्ला दिला आहे.

...तर ग्रूप ॲडमिनवरही गुन्हा

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ, फोटो एकमेकांना किंवा एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड करू नयेत. आपल्या ग्रुपला आलेले ते व्हिडिओ, फोटो डिलीट करावेत; अन्यथा संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनवरदेखील गुन्हा दाखल होऊ शकतो.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, सोलापूर शहर

‘बीएनएस २९४(२)’नुसार दाखल होईल गुन्हा

इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ, मेसेज फॉरवर्ड करून कोणाची बदनामी किंवा दोन जाती-धर्मांत तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्यास संबंधितावर भारतीय न्याय संहितेतील कलम २९४(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल होतो. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २९४(२) (जुने आयपीसी २९२/२९३ शी संबंधित) अश्लील साहित्य किंवा वस्तूंची विक्री, भाड्याने देणे किंवा वितरणाशी संबंधित आहे. ज्यामध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. कलम ३(५) हे संयुक्त उत्तरदायित्वास संदर्भित करते. जिथे अनेक व्यक्ती समान उद्देशाने गुन्हा करतात, तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या वैयक्तिक सहभागानुसार शिक्षा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com