शनिवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी शनिवारी येत्या दोन ते तीन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
rain
rain sakal

पुणे - पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी शनिवारी येत्या दोन ते तीन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. रविवारी आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोमवारी हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी प्रतिताशी वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असा इशारा मुंबईच्या हवामान विभागाने दिला आहे.

rain
Raj Thackeray | कसं आहे राज ठाकरेंचं नव घर ‘शिवतीर्थ’?

गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, गोव्यात ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच भागात तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे तापमान कमाल आणि किमान (अंश सेल्सिअसमध्ये)

शनिवार, ६ नोव्हेंबर - ३२ २०.८

रविवार, ७ नोव्हेंबर - ३२ २०

सोमवार, ८ नोव्हेंबर - ३३ १९

मंगळवार, ९ नोव्हेंबर - ३३ १९

बुधवारी, १० नोव्हेंबर - ३४ १८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com