मुंबईकरांनो, घरातच राहा! येत्या तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

देशातील २२ राज्यांमध्ये १८१ ठिकाणी पडणारा पाऊस मोजण्याची यंत्रणा हवामान खात्याने उभारली आहे. त्यात शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवार सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ठाणे येथे झाली.

पुणे : आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये देशात सर्वाधिक पाऊस ठाणे जिल्ह्यात नोंदला गेला. तेथे २८४ मिलीमीटर पाऊस पडला. मुंबईत पुढील तीस तासात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

देशातील २२ राज्यांमध्ये १८१ ठिकाणी पडणारा पाऊस मोजण्याची यंत्रणा हवामान खात्याने उभारली आहे. त्यात शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवार सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ठाणे येथे झाली. त्या खालोखाल मुंबईतील वेगवेगळ्या भागात चोवीस तासांमधला उचांकी पाऊस नोंदला. त्यात बांद्रा येथे २०० मिलीमीटर, सांताक्रूज़ १८९, दहिसर १७९, राम मंदिर १७८, महालक्ष्मी १६२,भाइंदर १४६, मीरा रोड १३६, कुलाबा १२३ मिलीमीटर पाऊस नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; काय आहे वाचा

दरम्यान, मुंबईकरांना, समुद्र किनारी जाऊ नये,  घरातच राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

निष्काळजीपणाचा ‘व्हायरस’ पसरतोय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of torrential rain in Mumbai in three hours