
ST Bus Fire Video : आपण आगीच्या अनेक घटनाबद्दल ऐकतो वाचतो, पण आज एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चालत्या बसने पेट घेतला. ही घटना इतकी भीषण होती की क्षणात बसमधून आगीचे लोट आणि धूर निघू लागला. ही घटना धाराशीवमध्ये तुळजापूर- नळदुर्ग रोडवर घडली. तीर्थ बुद्रुकजवळ बसला अचानक आग लागली. क्षणात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या चालत्या एसटी बसने पेट घेतला.