राज्यात यंदा "पाणीबाणी' नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - गतवर्षी समाधानकारक बरसलेल्या मॉन्सूनमुळे मागील अनेक वर्षापासून यंदा पहिल्यांदाच ऐन मे महिन्यातही राज्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा असल्याने "पाणीबाणी'चा सामना करावा लागणार नाही. राज्यातील 3248 लहान मोठ्या धरणात आजघडीला 23.98 टक्‍के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्यात पाचवीला पुजलेली पाणीटंचाई यंदा होणार नसल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे कायम पाणीटंचाई असलेल्या मराठवाड्यात कोकण व अमरावती विभागानंतर तिसऱ्या क्रमांकाचा पाणीसाठी असल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी आजच्या तारखेला राज्याच्या धरणांत केवळ 9 टक्‍के पाणीसाठी शिल्लक होता. तर, मराठवाड्यात रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग आला होता. सुमारे 11 हजाराहून अधिक गावे व वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. यंदा मात्र अशी स्थिती नसून केवळ चार हजारच्या आसपास गावांतच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक पर्जन्य असलेल्या कोकणात मागील वर्षी 29 टक्‍के पाणीसाठा होता. तर यंदा तो 49 टक्‍के इतका शिल्लक आहे. मराठवाड्‌यात मागील वर्षीच्या आजच्या तारखेला केवळ 1.07 टक्‍के पाणीसाठी होता. तो यंदा 28.65 टक्‍के इतका शिल्लक आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भातील अमरावती विभागात यंदा पाणीटंचाईच्या झळा नसल्याचे चित्र आहे. 

असा आहे पाणीसाठा (टक्‍क्‍यांत) 
विभाग : 2016 : 2017 
अमरावती : 9.40 29.22 
कोकण : 29.57 : 49.70 
नागपूर : 9.47 : 12.06 
नाशिक : 9.47 : 23.72 
पुणे : 9.1 : 18.09 
मराठवाडा : 1.07 : 28.65 

Web Title: water dam issue