बापरे! - वेकोलिने वाढविली सामान्यांची चिंता

राजेश रामपूरकर
Wednesday, 26 August 2020

उद्योगांसाठी कोळसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कोळशाच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाल्यास मालाच्या उत्पादन मूल्यात व किमतीत वाढ होते. वेस्टर्न कोल फिल्डसने त्यांच्या ११ खाणींतून काढण्यात येणाऱ्या कोळशाच्या दरात प्रति टन ४५० रुपयांची वाढ केली आहे. वेकोलिचा सर्वांत मोठ्या ग्राहकांत औष्णिक वीज निर्माता कंपन्या, स्टील व सिमेंट उत्पादकांचा समावेश आहे. कोळशाच्या किमतीत वाढ केल्याने विजेचे प्रतियुनिट दर वाढले आहेत.

नागपूर :  वेस्टन कोल्फिल्ड्सने त्यांच्या ११ खाणीतून निघणाऱ्या कोळशाच्या किमतीत अचानकच ४५० रुपये प्रतिटन वाढ केली. ही भाववाढ स्वतःचा ताळेबंद सुस्थितीत राहावा यासाठी केली आहे. वेकोलिने तात्काळ कोळशाचे दर कमी करावेत, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. या दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसू लागला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

तुमाने म्हणाले, की उद्योगांसाठी कोळसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कोळशाच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाल्यास मालाच्या उत्पादन मूल्यात व किमतीत वाढ होते. वेस्टर्न कोल फिल्डसने त्यांच्या ११ खाणींतून काढण्यात येणाऱ्या कोळशाच्या दरात प्रति टन ४५० रुपयांची वाढ केली आहे. वेकोलिचा सर्वांत मोठ्या ग्राहकांत औष्णिक वीज निर्माता कंपन्या, स्टील व सिमेंट उत्पादकांचा समावेश आहे. कोळशाच्या किमतीत वाढ केल्याने विजेचे प्रतियुनिट दर वाढले आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधीत ५४१ कोटी, उपराजधानीला किती मिळाले? वाचा सविस्तर - 

महाराष्ट्रात महाजेनेकोने दर वाढ केल्यानंतर महावितरणनेही वाढ केली. परिणामी उद्योगाला मिळणारी वीज महागली सोबतच घरोघरी येणारे वीजबिलही वाढले आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडला आहे. स्टील, सिमेंट, कोळसा अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. लोखंड, स्टील आधारित उद्योगात आधीच मंदी आली होती. अशीच परिस्थिती सिमेंट उद्योगात असताना उत्पादन मूल्य वाढल्याने या वस्तूंच्या किरकोळ किमतीवरही त्याचा थेट परिणाम झाला आहे. धातू, खते, कागद व विटा यांचेही किरकोळ दर वाढले आहेत. कोळशाचे दर वाढल्याने अनेक नियमित खरेदीदारांनी कोळसा खरेदीत असमर्थता दर्शविली आहे. कोळशाची दरवाढ कमी करण्यात यावी यासाठी उद्योजक व कोळसा व्यापारी निवेदन करीत आहेत. कोरोना महामारीच्या वेकोलिने कोळशाचे दर वाढविल्याने ते पर्यायी उत्पादकांकडे विचारणा करीत आहेत. 

कोळसा मंत्री, कोल इंडिया, वेकोलिला पत्र 

कोळशाच्या दरवाढीसंर्भातील एक पत्र केंद्रीय कोळसा मंत्र्यांना खासदार तुमाने यांनी लिहिले आहे. त्यात त्यांनी कोळशाच्या दरात केलेली वाढ कमी करावी, अशी मागणी केली आहे. या शिवाय कोल इंडिया व वेकोलिला पत्र लिहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WCL Increased Coal Prices