आम्ही सारे नयनतारा !

सुशांत सांगवे
शनिवार, 12 जानेवारी 2019

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल या प्रत्यक्षात आल्या नसल्या तरी, त्यांचे मुखवटे घालून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी झाल्या व सहगल यांच्या "निमंत्रण वापसी'चा निषेध केला. दुसरीकडे सहगल यांच्या भाषणाची प्रतही काही तरुणांनी संमेलनस्थळी रसिकांना उपलब्ध करून दिली. 

या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन सहगल यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांच्या नावाला विरोध झाल्याने आयोजकांनी सहगल यांना संमेलनाला येऊ नका, असे सांगितले. या "निमंत्रण वापसी'वरून आयोजक आणि महामंडळावर चौफेर टीका झाली. वाद आणखी वाढू नये व सहगल यांचे भाषणही वाचून दाखवायचे नाही, असा निर्णय या दोन्ही संस्थांनी घेतला आहे. याचा निषेध म्हणून त्यांचे मुखवटे चेहऱ्यावर बांधून संमेलनस्थळी येण्याचा निर्णय काही महिलांनी घेतला. हा निषेधाचा सूर दिसताच आयोजकांनी तातडीने मुखवटे ताब्यात घेतले.
 
Web Title: we are all Nayantara Sahitya Sammelan