esakal | उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला येणार 'मोठा भाऊ'
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (गुरूवार) शपथविधी घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला येणार 'मोठा भाऊ'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबईः महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (गुरूवार) शपथविधी घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

मुख्यमंत्री सोहळ्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधीसाठी बोलवणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी आम्ही सगळ्यांना बोलवणार आहोत अगदी अमित शहा यांनाही शपथविधीचे निमंत्रण देणार आहोत, असेही राऊत म्हणाले.