
Heavy rains lash Maharashtra as monsoon withdrawal delays, causing floods and crop losses in several districts.
esakal
Summary
मान्सूनचा परतीचा प्रवास लांबल्यामुळे राज्यात पाऊस ५ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यासाठी कारणीभूत ठरला आहे.
मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात अतिवृष्टीने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र राज्यात पावसाने अद्याप उघडीप दिलेली नाही. अशातच आता आणखी राज्यातील मान्सूचा परतीचा प्रवास लांबल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.