

Heavy rain lashes Maharashtra under the influence of Montha cyclone and Arabian Sea low-pressure system; IMD issues yellow alert for several districts.
esakal
Summary
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीमुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भात आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागांत मागील आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे.बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ, अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. दरम्यान विदर्भात पावसाचा आज जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.