

Rainfall and temperature fluctuation in Maharashtra
esakal
IMD Weather Alert Maharashtra : महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा मोठ्या प्रमाणात कमी झाला, तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उकाडा जाणवत आहे. आज (ता. २२) किमान तापमानातील वाढ कायम राहणार असून, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.