Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा सावट; 19 जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'चा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

मुंबईसह उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडणार आहेत.

Weather Update ; 19 जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'चा इशारा

एेन थंडीच्या हंगामात राज्यात पावसाने (Heavy Rainfall)धुमाकूळ घातला आहे. यामुळे वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. हवामान विभागाने यापूर्वीच अलर्ट दिला आहे. आज परत कोकण, मध्य महाराष्ट्र (Konkan, Central Maharashtra,Marathwada) तसेच संलग्न मराठवाड्यात 4 दिवस जोरदार वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विज चमकताना घराबाहेर न पडण्याचा असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा: मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. उद्याही राज्यात कमी अधिक प्रमाणात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

तर मुंबईसह उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडणार आहेत. आज सकाळपासूनच काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

loading image
go to top