महाराष्ट्र गारठला! कुठे होणार पाऊस? कुठे वाढली थंडी? | Weather Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update

महाराष्ट्र गारठला! कुठे होणार पाऊस? कुठे वाढली थंडी?

महाराष्ट्रात (maharashtra) मुंबई (mumbai) आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने थंडी वाढली (weather update) आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज तसेच काही भागात पावसाची (rain) शक्यता हवामान विभागाकडून (weather forcast) वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या कुठे होणार पाऊस? कुठे वाढली थंडी?

नाशिकला सर्वात कमी तापमानाची नोंद

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळ आल्याने थंडी वाढली आहे. सोमवारी (ता.१०) नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजे 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर जळगावात 9 अंश किमान तापमान नोंदविले गेले. तर देशातील बिहार, आसाम, अरूणाचल प्रदेश आणि मराठवाड्यातील काही भागांसह दक्षिण लामीळनाडू, केरळ व अंदमान निकोबारच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानमध्ये थंडी वाढत आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात किमान तापमाणात घट झाली आहे.

थंडी वाढली

हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये किमान तापमान 0.2 सेल्सिअस झाले आहे. तर पहलगाम मध्ये मायनस 2.6, गुलमर्गमध्ये मायनस 10.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लडाखच्या द्रास शहरात मायनस 8.8, लेहमध्ये मायनस 7.3 आणि कारगिलमध्ये मायनस 7.0 तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू शहरात रात्रीचे किमान तापमान 9.7, कटरा 7.6, बटोटे मायनस 0.8, बनिहाल मायनस 1.8 आणि भदेरवाह मायनस 0.1 सेल्सिअस तापमान झाले आहे. त्यामुळे या भागात थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे.

हेही वाचा: राज्यात काल दिवसभरात 33 हजारहून अधिक रुग्ण; 31 नवे ओमिक्रॉनबाधित

कुठे होणार पाऊस?

देशातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तर दक्षिण छत्तीसगड, विदर्भाचा काही भाग आणि आग्नेय मध्य प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशातील उर्वरित भाग आणि झारखंड, अंतर्गत ओडिसा आणि उत्तर तेलंगणाच्या वेगळ्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा: केंद्राच्या दाव्यानुसार देशात रोजगार वाढले

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top