
राज्यात काल दिवसभरात 33 हजारहून अधिक रुग्ण; 31 नवे ओमिक्रॉनबाधित
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावामुळे कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असून राज्यामध्ये नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज राज्यात 33 हजार 470 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा: Opinion Poll: यूपीत भाजप तर पंजाबमध्ये आप? पाच राज्यात कसं असेल चित्र?
राज्यात आज २९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यत एकूण ६६,०२,१०३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९५% एवढे झाले आहे. आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,५३,५१४ (९.८३ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा: भारतात मुस्लिमांना भाजपकडून टार्गेट केलं जातंय - इम्रान खान
ओमिक्रॉनबाबत सध्या काय आहे स्थिती?
राज्यात आज ३१ कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये,
पुणे - 28
पुणे ग्रामीण - 2
पिपरी चिंचवड - 1
आजपर्यंत राज्यात एकूण १२४७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण सापडले आहेत.
Web Title: More Than 33000 Corona Patients In The State Today 31 New Omicron Infected
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..