esakal | राज्यावर आस्मानी संकटाचे ढग; पुढच्या 4 दिवसात मुसळधार - IMD
sakal

बोलून बातमी शोधा

 IMD Impact of unseasonal rain May be decreases Maharashtra

राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.

राज्यावर आस्मानी संकटाचे ढग; पुढच्या 4 दिवसात मुसळधार - IMD

sakal_logo
By
स्नेहल कदम

काही दिवसांपूर्वी झालेल्या गुलाब आणि शाहीन चक्रीवादळामुळे राज्यात वेगाच्या वाऱ्यासह पाऊस झाला. गुलाब वादळाने झालेल्या मुसळधार पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले. राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून कोकण, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील 4-5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: शाहरुखचा आर्यन कसा अडकला? उद्योगपतींच्या मुलांचीही नावं

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर घाट परिसरात मुसळधार पावसाचा ईशाराही देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस नोंदला गेला. तर कोकणात कमाल तापमान हे सरासरीच्या १ ते ३ अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा: शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!

ऑक्टोबर हिट

राज्यात विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. हे होत असताना पाऊस उघडल्यानंतचर पुन्हा उन्हाचे चटकटे जाणवू लागले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागांमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी पोषक हवामानाचे संकेत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असताना या कालावधीत उष्णतेत ही वाढ होते. दिवसातील कमाल व किमान तापमानात वाढलेली तफावत ही ऑक्‍टोबर हीट म्हणून ओळखली जाते. सध्या असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. सध्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर कडक उन्हाचा चटकादेखील वाढला आहे.

loading image
go to top