Weather Update: पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अलर्ट जारी

Weather Update: देशातील विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्वण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण भारतामध्ये आज जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal

देशातील विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्वण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण भारतामध्ये आज जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात तमिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, आणि लक्षद्वीपमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर, उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज (मंगळवारी) संपूर्ण उत्तर भारत आणि जवळच्या काही भागातील वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे 9 जानेवारी रोजी जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशातील कोणत्या भागात पावसाची शक्यता

अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भातही आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather Update
शिक्षण खात्याचा ३ महिन्यांत दुसरा आदेश! शाळांमधील विद्यार्थ्यांना आता ‘हा’ चित्रपट दाखवा, त्यासाठी इच्छुकांकडून २० रूपयांचे शुल्क घ्या

छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, तेलंगणा आणि रायलसीमा या भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

उत्तर भारतात दाट धुके

तर उत्तर भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि ईशान्य भारतातील अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दाट धुक्यामुळे उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतामध्ये हवेचे गुण खूपच खराब असण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात हवेची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे.

राजधानी दिल्लीत मंगळवारी हलका पाऊस पडू शकतो. दिल्लीतील IGI विमानतळावर धुक्याचा प्रभाव दिसून आला, त्यामुळे 47 विमान उड्डाणांवर परिणाम झाला.

Weather Update
६ दिवसांत सोलापूर बाजार समितीत ४.६० लाख क्विंटल कांद्याची आवक! नुसता बारदाना व भाड्यावरच शेतकऱ्यांचा ५.६० कोटींचा खर्च; निर्यातबंदीमुळे सरासरी भाव १४०० रुपयेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com