Weather Update : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात येत्या दोन दिवसांत पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 April 2021


पुण्यात बुधवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.३ अंश सेल्सिअसने वाढून ३९.५ अंश सेल्सिअस नोंदला. राज्यात सर्वांत कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहेत. काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे.

पुणे : मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने बुधवारी वर्तविली. पुण्यात बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाजही वर्तविला आहे.

पुण्यात बुधवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.३ अंश सेल्सिअसने वाढून ३९.५ अंश सेल्सिअस नोंदला. राज्यात सर्वांत कमाल तापमान अकोला येथे ४२.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहेत. काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. उद्यापासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

देशाच्या पूर्वेकडून उत्तरेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच वेळी झारखंड आणि छत्तीसगडच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प ओढून घेतले जात आहे. त्याचा थेट परिणाम या भागात आणि लगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल.

येथे होणार अवकाळी पाऊस
- शुक्रवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा.
- शनिवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.
- रविवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ.

दिवसभरातील मुख्य बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather Update Two days of rain forecast in vidarbha and Central Maharashtra