Wedding Ritual : नवऱ्याबरोबर नाही तर नणंदेबरोबर घेते सात फेरे, अजब लग्नाची प्रथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding Ritual

Wedding Ritual : नवऱ्याबरोबर नाही तर नणंदेबरोबर घेते सात फेरे, अजब लग्नाची प्रथा

Wedding Ritual : जगात अनेक विचित्र प्रथा आहेत ज्या आजही पाळल्या जातात. केवळ जगातच नाही तर भारतातही अशा अनेक परंपरा पाळल्या जातात, ज्याबद्दल आपण ऐकलं की आपल्याला थक्क व्हायला होतं. म्हणजे असं म्हणतात की, दर चार किलोमीटर अंतरावर भाषा बदलते, अगदी तसच आपल्या परंपरा, चालीरीतीही बदलत असतात. कधीकधी तर एकाच धर्मात आणि एकाच जातीतही वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात.

हेही वाचा: Food Recipe : रोज पोळी खाऊन कंटाळा आलाय; हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी बनवा घरच्या घरी

या प्रथा अनेकदा विवाहसोहळ्यांच्या निमित्ताने समोर येतात. कुठं मामा भाचीचे तर कुठं भावाच्या बहिणीचं लग्न लावलं जातं. तर कधी आत्या मामाच्या मुलामुलीं बरोबर लग्न लावलं जातं. हिमाचल प्रदेशमध्ये सुध्दा अशाच काही परंपरा आणि प्रथा आहेत. तिथं वराच्या ऐवजी त्याची बहीण लग्न मंडपात बसते. त्यानंतर भावाच्या बायकोशी लग्न करून तिला घरी आणते.

हेही वाचा: Pakistan VS China : स्वस्त फोन घ्यायलाही पैसे नाहीत! चीनने चोळले पाकिस्तानच्या जखमेवर मीठ

हिमाचल प्रदेश हे राज्य त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल जातं. त्याचबरोबर हिमाचलच्या अनोख्या चालीरीतीही लोकांच्या कुतूहलाचा विषय असतात. अशाच एका प्रथेनुसार हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती या आदिवासी भागात एक बहीण आपल्या भावासाठी वधू आणायला मोठ्या थाटामाटात त्याच्या सासरच्या घरी जाते. मग वराची बहीण आपल्या वहिनीसोबत सप्तपदी घेते आणि लग्न झाल्यावर वहिनीला घरी आणते.

हेही वाचा: Weekend Travel : फक्त एकच दिवस सुट्टी घ्या आणि ४ दिवस फिरा; कसं कराल नियोजन ?

आणि वराला बहीणच नसेल तर...?

आता प्रश्न पडतो की एखाद्याला बहीण नसेल तर त्याचं लग्न कसं लावलं जातं? तर लाहौल स्पितीच्या जमातींमध्ये अशी परंपरा आहे की जर एखाद्या मुलाला बहीण नसेल तर त्याचा लहान किंवा मोठा भाऊ वर बनतो आणि लग्नाचे सर्व विधी पार पाडल्यानंतर वधूला घरी आणतो. ही प्रथा खूप जुनी आहे असं म्हणतात.कोण्या एकेकाळी लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा घरी नव्हता, त्यावेळी अशा पद्धतीने लग्न लावून नवरीला घरी आणण्यात आलं होतं, आणि तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरूच आहे.

हेही वाचा: Ganesh Jayanti: गणेश जयंती निमित्त जाणून घ्या मुहूर्ताची वेळ, तिथी आणि धार्मिक महत्त्व...

आपल्या भारत देशात आई-मुलानंतर भाऊ-बहिणीचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. तरीही देशात काही ठिकाणी भावा बहिणीच लग्न लावलं जातं. आदिवासीबहुल छत्तीसगडमध्ये भावाचं लग्न बहिणीशी लावण्याची परंपरा आहे. राजस्थानमधील जोधपूर आणि आसपासच्या भागात अविवाहित मुलांना काठीने मारहाण करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. विवाहित महिला या मुलांना मारहाण करतात. आता परदेशी महिलाही या परंपरेत सामील होतात. स्त्रिया पूर्णपणे साज शृंगार करून घराबाहेर पडतात आणि पोरांना मारहाण करतात. मारहाण झालेल्या मुलांचं वर्षभरात लग्न होतं अशी मान्यता आहे.