राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल आठवडा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मुंबई - राज्यात 1 ते 7 ऑगस्ट, 2016 दरम्यान महसूल आठवडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत महिला खातेदारांसाठी गाव पातळीवर मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यात त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यिात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
 
राज्यात 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तारीख 1 ते 7 ऑगस्ट,2016 या कालावधीत महसूल आठवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत कृषी सहकार, महिला व बालकल्याण या विभागांमार्फत शेतकऱ्यांसाठी, विशेषत्वाने महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महिला खातेदारांच्या महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या अडीअडचणी समजून घेण्यात येणार असून, त्यांचे त्याच ठिकाणी निराकरण करण्यात येणार आहे. महसूल आठवड्यात गावपातळीवर महिला खातेदारांचे मेळावे आयोजित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही महसूलमंत्री पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Week from August 1, the State Revenue