esakal | बंगालमध्ये रडीचा डाव; शरद पवारांचा भाजपवर निशाणा

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

सध्या तृणमूल २१५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७५ जागांवर आघाडीवर आहे. बंगालमधील या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे.

बंगालमध्ये रडीचा डाव; शरद पवारांचा भाजपवर निशाणा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

West Bengal Assembly Election 2021 : मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला भरघोस यश मिळाले, पण नंदीग्राममध्ये भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरवातीला ममतांचा विजय झाल्याबद्दल तेथे आनंदोत्सवाला सुरवात झाली होती. पण हे वृत्त खोटं असल्याचं आता समोर येत आहे. नंदीग्राममध्ये नक्की कोण विजयी झालं आहे, याबाबत निवडणूक आयोगाने सध्यातरी जाहीर केलं नसलं तरी सध्या सुरू असलेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

हेही वाचा: हा विजय जनतेला समर्पित : पी. विजयन

पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!'

ट्विटवरून शरद पवार यांचा रोख भाजपकडे असल्याचे दिसून येत आहे. सध्या तृणमूल २१५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७५ जागांवर आघाडीवर आहे. बंगालमधील या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात काही फेरफार करण्यात आला आहे. मला निकाल मान्य आहे, पण याविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचंही ममता म्हणाल्या.