esakal | पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात ‘रेड अलर्ट’
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon

पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात ‘रेड अलर्ट’

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - मॉन्सूनच्या (Monsoon) सरीने राज्यातील बहुतांश भागात जोर धरला आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातही बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना चार ते पाच दिवसांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. (Western Maharashtra and Konkan Red Alert Rain Monsoon)

गेल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ओढ दिली. तर गडचिरोली, चंद्रपूर वगळता उर्वरित विदर्भातही पाऊस नाही. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने भर पावसाळ्यात उन्हाळा अनुभवायला मिळाला. जळगावमध्ये तर कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला. मात्र दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पुन्हा हवेत गारवा तयार झाल्याने कमाल तापमानाचा पारा घसरला आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड येथे ३७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

हेही वाचा: राज्यातल्या सर्व पोटनिवडणुका स्थगित; आयोगानं दिलं 'हे' कारण

पुढील दोन्ही आठवड्यांतील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केला आहे. यात पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर ते सरासरी इतके राहणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या हजेरीनंतर कमाल तापमानात घट होणार आहे. अनेक भागांत किमान तापमान सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे.

मॉन्सूनची वाटचाल सुरू होणार

गेले अनेक दिवस उत्तर भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास मंदावला होता. मागील दोन दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाल्याने वाटचाल सुरू होणार आहे. आज (शनिवारी) दिल्लीसह, पंजाब हरियाना, राजस्थानच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली.

loading image