पश्‍चिम रेल्वे झाली 164 वर्षांची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

मुंबई - पश्‍चिम रेल्वेचा 164 वर्षांचा समृद्ध इतिहास प्रवाशांपुढे यावा, या हेतूने वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक 1वर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवारपर्यंत (ता. 14) सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवाशांसाठी खुले राहील.

जागतिक वारसा-1 दर्जा मिळालेल्या वांद्रे स्थानकाची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी पश्‍चिम रेल्वेने 12 ते 14 फेब्रुवारीदरम्यान "हेरिटेज उत्सव' हे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनात जुन्या कलाकृती, माहितीफलक, रेल्वेगाड्यांच्या प्रतिकृती, ऐतिहासिक छायाचित्रे व दस्तऐवज मांडण्यात आले आहेत. दूरध्वनी, वाफेवर धावणाऱ्या इंजिनाचा वेग दाखवणारे यंत्र, जुने सिग्नल, डिझेलवर चालणाऱ्या इंजिनाची प्रतिकृती, 19व्या शतकातील इंजिनांची छायाचित्रे, जुने पूल आणि स्थानकांची छायाचित्रे ही प्रदर्शनातील आकर्षणे आहेत.

प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभाला पश्‍चिम रेल्वेच्या यांत्रिक विभागाचे वरिष्ठ अभियंता ए. अग्रवाल, मुंबई सेंट्रल विभागाचे रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार आणि पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western Railway 164 years