स्वप्नातील घरासाठी कायपण! वाळूची वाट न पाहता क्रश सॅंड वापरून ११८६६ लाभार्थींनी घरकूल पूर्ण केलेच; ‘महाआवास’मध्ये सोलापूरचा राज्यात डंका

वाळू लिलाव चार-पाच वर्षांपासून बंदच आहेत. त्यामुळे घर बांधकामासाठी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर मात करीत जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ८६६ बेघर कुटुंबांनी स्वप्नातील निवारा पूर्ण करण्यासाठी क्रश सॅंड वापरून बांधकामे पूर्ण केली.
Solapur ZP
Solapur ZPEsakal

सोलापूर : जिल्ह्यातील वाळू लिलाव चार-पाच वर्षांपासून बंदच आहेत. त्यामुळे घर बांधकामासाठी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर मात करीत जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ८६६ बेघर कुटुंबांनी स्वप्नातील निवारा पूर्ण करण्यासाठी क्रश सॅंड वापरून बांधकामे पूर्ण केली. त्यामुळे ‘महा-आवास अभियान’अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि आता मोदी आवास योजना, या माध्यमातून राज्यातील बेघरांना हक्काचे घरकुल बांधणीसाठी सव्वालाखांपर्यंत अर्थसहाय केले जाते.

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ५२ हजार लाभार्थींना त्याचा लाभ झाला असून त्यांचे घरकूल पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने २०२१-२२ या वर्षात ‘महा-आवास अभियान’ राबविले. त्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलांचे बांधकाम करताना वाळू नसल्याने काम न थांबविता लाभार्थींनी क्रश सॅंड, सिमेंट ब्लॉक, फ्लाय ॲश, इंडर लॉकींग, हॉलो ब्रिक्सचा वापर केला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही लाभार्थींना क्रश सॅंड व वाळू, यातील फरक दाखवून दिला. त्यानंतर वाळूची वाट न पाहता क्रश सॅंड वापरून जिल्ह्यातील ११ हजार ८६६ जणांनी घराचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे कौतूक राज्य सरकारने देखील केले आहे. आता सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आवास योजनेत जिल्ह्याची कामगिरी सुधारली आहे.

११ हजार ३५४ लाभार्थींकडून घरांची सजावट

वर्षानुवर्षे पडक्या घरात किंवा झोपडीत राहणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचा मजबूत निवारा मिळाला. स्वप्नातील घरकुल साकारल्यानंतर ११ हजार ३५४ लाभार्थींनी स्वत:हून खर्च करीत रंगरांगोटी, फरशी, किचन गार्डन, परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा साधने बसविली. त्याचेही कौतूक राज्यस्तरावरून झाले आणि ‘महा-आवास अभियान’मध्ये सोलापूर जिल्हा अव्वल ठरला.

६०० रुपये ब्रासची वाळू गेली कोठे?

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सर्वसामान्यांना विशेषत: घरकूल लाभार्थींना घर बांधकामासाठी स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ऐतिहासिक निर्णय घेतला. ६०० रुपयांत एक ब्रास वाळू मिळणार असल्याने अनेकांनी त्या निर्णयाचे कौतुक केले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर वगळता इतर १० तालुक्यांमधील १० हजार बेघर लाभार्थींना ५० हजार ब्रास वाळूची गरज आहे. अजूनही त्यांना स्वस्तातील वाळू मिळालेली नाही, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com