Exit Poll 2019 : मोदी की गांधी? आज अंदाज येईल!

रविवार, 19 मे 2019

मतदानाची वेळ संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोल २०१९ चे अंदाज प्रसिद्ध होण्यास सुरवात होईल. पण हे एक्झिट पोल म्हणजे नेमकं असतं काय?

एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान होत आहे आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद होणार आहे.

मतदानाची वेळ संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोल २०१९ चे अंदाज प्रसिद्ध होण्यास सुरवात होईल. पण हे एक्झिट पोल म्हणजे नेमकं असतं काय?

हे काय प्रकरण आहे?
मतदान केंद्रांवर मतदान करून आलेल्या मतदारांचा लगेचच घेतलेला कौल म्हणजे एक्झिट पोल! हे काम विविध स्वयंसेवी संस्था, प्रसिद्धी माध्यमे आणि राजकीय विश्लेषक करत असतात. एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्तेत ये ईल, याचे चित्र उभे करतात.

एक्झिट पोल कसे घेतले जातात?
भारतात विविध संस्था वेगवेगळ्या शास्त्रोक्त पद्धती वापरून एक्झिट पोल घेतात. सर्वांत प्राथमिक पायरी म्हणजे नमुने किंवा सॅॅम्पलिंग! काही संस्था मतदारससंघांचे रान्डम सॅमप्लिंग करतात; तर काही संस्था शास्त्रोक्त पद्धतीने ही संख्या ठरवितात. पण दोन्ही पद्धतींमध्ये वय, लिंग, जात आणि धर्म यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो.

एक्झिट पोलवर मर्यादित बंदी का?
यापूर्वी मतदान सुरू असताना एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध केले जात असत. २००४ मध्ये सरकारने एका कायद्यान्वये त्यावर बंदी घातली. आता निवडणूक आयोगाने ठरविलेल्या कालावधीमध्ये कुणालाही एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येत नाही. सर्वसामान्यत:, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपल्यानंतरच एक्झिट पोल प्रसिध्द करता येतात.

महाराष्ट्राचा कौल काय?
महाराष्ट्रातील मतदानाच्या तीन टप्प्यांदरम्यान 'सकाळ माध्यम समूहा'ने मतदारराजाचा कौल जाणून घेतला. उद्याच्या (सोमवार) 'सकाळ'मध्ये वाचा खास महाराष्ट्राचा एक्झिट पोल २०१९!

#ResultsWithSakal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Are Exit Polls and all you need to know about it