काय सांगताय? सोलापूर जिल्ह्यातील १३ लाख मतदारांनी २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच केले नाही; मतदानातील घट कोणाला पराभूत करणार...

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मागील दोन्ही निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाले. पण, २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीवेळी जिल्ह्यातील साडेबारा ते १३ लाख मतदारांनी मतदानच केले नाही. त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व शहर उत्तर येथील मतदार सर्वाधिक आहेत.
voter person
voter personsakal

सोलापूर : लोकसभेसाठी सोलापूर जिल्ह्यात माढा व सोलापूर हे दोन मतदारसंघ आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मागील दोन्ही निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाले. पण, २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीवेळी जिल्ह्यातील साडेबारा ते १३ लाख मतदारांनी मतदानच केले नाही. त्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व शहर उत्तर येथील मतदार सर्वाधिक आहेत. आता आगामी निवडणुकीत कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, या समिकरणाची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी तीन हजार ५९९ मतदान केंद्रे असून मागील निवडणुकीत तब्बल २७४ केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. त्यात शहर उत्तर दहा, शहर मध्य ७१, अक्कलकोट ५४, दक्षिण सोलापूर ६८ व पंढरपूरमधील २६ केंद्रे आहेत. विशेष म्हणजे हे विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यावरच काँग्रेस उमेदवाराला विजय शक्य आहे. दोन्ही निवडणुकीत दीड-पावणेदोन लाख मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. पण, आता काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांना बूथ यंत्रणा सक्षम करून मतदानाची टक्केवारी वाढवावीच लागेल. जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मतदार, मतदानादिवशी फिरायला गावी जाणारे मतदार, मतदानाला न येणारे मतदार, यांच्यावर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार आहे. त्याशिवाय विजयाचे समीकरण तंतोतंत जुळणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोकसभेसाठी मतदान न केलेल्यांची संख्या

  • २०१४मधील स्थिती

  • एकूण मतदार

  • ३०,९९५४०

  • मतदान न केलेल्या महिला

  • ६,३६,४४९

  • मतदानाला न आलेले पुरुष

  • ६,०३,७५१

  • एकूण

  • १२,४०,२००

------------------------------------------------

२०१९मधील स्थिती

  • एकूण मतदार

  • ३३,८७,६१३

  • मतदान न केलेल्या महिला

  • ६,६५,९१४

  • मतदानाला न आलेले पुरुष

  • ६,४४,९३८

  • एकूण

  • १३,१०,८५२

केंद्रांवरील रांगांचाही मतदानावर परिणाम

जिल्ह्यातील ३५ लाख ७८ हजार ९७२ मतदारांसाठी यंदा ३५९९ मतदान केंद्रे आहेत. मतदानावेळी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असतात. त्यानंतर कडक उन्हामुळे अनेकजण सायंकाळी पाचनंतर मतदानाला जाण्याचे नियोजन करतात. पण, अनेकांना जमतच नाही. दरम्यान, रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी परजिल्ह्यात स्थलांतरित झालेले मतदार निवडणुकीवेळी येत नाहीत. अनेकजण सुट्टी असल्याने परगावी फिरायला जातात. अनेकजण आपल्या एका मताने काय होईल या मानसिकतेमुळे देखील येत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.

मतदानाची टक्केवारी वाढीचा प्रयत्न

दोन्ही लोकसभा निवडणुकीवेळी ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये किंवा केंद्र परिसरातील मतदारांमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकशाहीत मतदानाला फार महत्त्व असून प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

मतदानादिवशी खासगी कामगारांनाही सुट्टी

सोलापूर जिल्ह्यात २०१४मध्ये जवळपास ३१ लाख मतदार होते, पण त्यातील १२ लाख ४० हजार मतदारांनी मतदानच केले नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत देखील ३३ लाख ८८ हजारांपैकी १३ लाख ११ हजार मतदार मतदानापासून दूरच राहिले. यंदा मतदानादिवशी खासगी कामगारांना देखील किमान ३ तासांची सुट्टी दिली जाणार असून त्यादृष्टीने सर्व व्यावसायिकांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com