Chhaava Movie : संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलाचं औरंगजेबाने काय केलं ?

Shahu Maharaj and Maharani Yesubai: मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी बहादूरशहाने शाहू महाराजांना मुक्त केलं. त्यांच्यावर दबाव कायम राहावा यासाठी त्यांच्या आईला म्हणजेच येसुबाईंना मात्र कैदेतच ठेवलं.
maharani yesubai aurangzeb
maharani yesubai aurangzebesakal
Updated on

मुंबई : औरंगजेबाने संभाजी महाराजांची किती निर्घृणपणे हत्या केली हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर त्याने मराठा साम्राज्याविरोधात एक मोठी खेळली रचली.

औरंगजेबाने संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई आणि मुलगा शाहू यांना ताब्यात घेतले. संभाजी महाराजांची एवढ्या निर्दयीपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाने येसुबाई आणि शाहू यांना मात्र कायम जिवंत ठेवले.

याचा अर्थ औरंगजेबाने त्यांच्यावर दया दाखवली का ? (What Aurangzeb did to Sambhaji's wife yesubai and son shahu )

maharani yesubai aurangzeb
Bank Job : या बँकेत सुरू झाली आहे भरती; गलेलठ्ठ पगार घेण्याची संधी

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १२ मार्च १६८९ रोजी त्यांचे धाकटे भाऊ राजाराम यांना छत्रपती करण्यात आले. त्यानंतर १३ दिवसांनी म्हणजेच २५ मार्च १६८९ रोजी मुघल सैन्याने रायगड किल्ल्यावर हल्ला केला.

रायगडचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्याने संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई आणि मुलगा शाहू यांना कैद केले.

औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले; पण महाराणी येसूबाई आणि शाहू यांना कैदेत जिवंत ठेवले; कारण बुद्धिबळात प्रत्येक प्याद्याला किंमत असते.

maharani yesubai aurangzeb
Holi Festival : होळी खेळताना रंग डोळ्यांत गेल्यास काय कराल ?

मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी बहादूरशहाने शाहू महाराजांना मुक्त केलं. त्यांच्यावर दबाव कायम राहावा यासाठी त्यांच्या आईला म्हणजेच येसुबाईंना मात्र कैदेतच ठेवलं.

बंदिवासातून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्यावर आपला हक्क सांगितला. सुरुवातीला राणी ताराबाईने शाहूजींचा अधिकार नाकारला. पण शाहू महाराज हे संभाजी महाराजांचे पुत्र होते. त्यांना मराठ्यांमध्ये सिंहाचा छावा अशी ओळख होती.

लोकांच्या दबावामुळे राणी ताराबाईंना शाहू महाराजांना राजा म्हणून स्वीकारावे लागले. सन १७०९ मध्ये राणी ताराबाईंनी कोल्हापुरात स्वत:चे स्वतंत्र दरबार स्थापन केले परंतु तेथेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

राजारामाची दुसरी पत्नी राजसाबाई आणि तिचा मुलगा संभाजी द्वितीय यांनी ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांना तुरुंगात टाकले. १७२६ मध्ये शिवाजी दुसरा तुरुंगात मरण पावले.

१७३० मध्ये छत्रपती शाहू महाराज भोसले यांनी राणी ताराबाईंची तुरुंगातून सुटका केली. त्यानंतर त्यांना साताऱ्यात राहाण्याची परवानगी मिळाली. पण शाहू महाराजांनी ताराबाईंसमोर एक अटही ठेवली. ती कोणत्याही राजकीय प्रकरणात ढवळाढवळ करणार नाही, अशी अट होती.

महाराज शाहू आजारी पडल्यावर पुन्हा एकदा मराठा साम्राज्याच्या उत्तराधिकार्‍यांचा प्रश्‍न निर्माण झाला. संभाजी दुसरा हा छत्रपती राजाराम महाराजांचा यांचा मुलगा होता. पण त्यांनी महाराज शाहूंना गादीच्या अधिकाराबाबत विरोध केला होता. त्यामुळे त्याला सत्ता देण्यात आली नाही.

बऱ्याच घडामोडींनंतर मराठी साम्राज्याची सूत्रे पेशव्यांकडे गेली. या घटनांच्या काही वर्षे आधीच १७०७ सालीच औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. त्याही पूर्वी ताराबाईंनी अनेक मुघक सरदारांना लाच देऊन आपल्याकडे वळवून घेतेल होते. त्यामुळे औरंगजेबाची खेळी फारशी यशस्वी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com