शिवसेना-भाजप पक्षाबद्दल काय म्हणाले मनोहर जोशी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 डिसेंबर 2019

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे.

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

महाविकास आघाडीचे सरकार येऊन १३ दिवस झाल्यानंतरही मनोहर जोशी हे अजूनही शिवसेना भाजप युतीचा आग्रह सोडत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेच्या झालेल्या कोंडीविषयी मनोहर जोशी यांना विचारल्यावर त्यांनी मत व्यक्‍त केले. ते म्हणाले, की शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र राहिले असते तर ते योग्य झाले असते.

राणे यांना पनवती म्हणणे अयोग्य

मात्र सध्याच्या स्थितीत दोन्ही पक्षांना ही युती नको आहे, अशी खंत मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. शिवसेनेने भाजपसोबत राहायला हवे, असे माझे मत असले तरी त्याबाबत निर्णय पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे, असेही जोशी यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did Manohar Joshi say about the Shiv Sena BJP party