स्मार्ट ग्राम योजनेविषयी हसन मुश्रीफ यांनी काय केली घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

३६ हजार किमीचे रस्ते
मुश्रीफ म्हणाले, की प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यामधून राज्यात अजून साधारण २० हजार किमी रस्त्यांची कामे बाकी आहेत. पुढील पाच वर्षांत गावांना जोडणारे सुमारे ३६ हजार किमीचे रस्ते करण्याचे आम्ही निश्‍चित केले आहे. आगामी अर्थसंकल्पात त्याला मान्यता मिळण्यासाठी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.

पुरस्काराची रक्कम (रुपयांत)
१० ऐवजी २० लाख - तालुकास्तरावर
४० ऐवजी ५० लाख - जिल्हास्तरावर

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येणार आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठी क्रांती घडविली होती. केंद्र सरकारनेही या योजनेची दखल घेऊन देशस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू केली होती. आता त्यांच्या नावे स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून मान्यतेनंतर राज्यात ही योजना राबविली जाईल, असे ते म्हणाले. 

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागाच्या सध्या सुरू असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्‍यक आहे. या सुधारणा करून ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येईल. तसेच, या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. या योजनेत तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना १० लाखऐवजी २० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ४० लाखऐवजी ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What Hasan Mushrif Announces About Smart Village Plan