
'एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी, फिर मैं खुद की भी नहीं सुनता', ही स्टाईल बॉलिवूडमध्ये सलमानची… पण कोल्हापुरात ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची होती. 2024 मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, "शक्तीपीठ महामार्ग नको असेल, तर तो रद्द करतो." पण खरंच रद्द झाला का? वर्ष उलटलं, सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले आणि शक्तीपीठ महामार्ग पुन्हा चर्चेत आला, कारण हा महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.