
Tantrik Sex : IIT च्या विद्यार्थ्यांसोबत झालेलं 'तांत्रिक सेक्स', काय झालेलं नेमकं ?
देशातील नामांकित अशा IIT मुंबईमध्ये शिकणारा विद्यार्थी. पण गेल्या अनेक दिवसांपासून तो तांत्रिक सेक्सला बळी पडत होता. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे एका सुशिक्षित आणि चांगली कमाई करणाऱ्या जोडप्याकडून या विद्यार्थ्यांवर तांत्रिक सेक्सचे प्रयोग केले जात होते. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ...
आयआयटी मुंबईमध्ये शिकणारा ३० वर्षाचा विद्यार्थी. दोन वर्षांपूर्वी त्याची ग्रींडर अँपवर त्याची शुब्रो नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली तेव्हा शुब्रोने आपली दुसरी बाजू दाखवायला सुरुवात केली. तो विद्यार्थ्यांवर तंत्र, मंत्राचा वापर करून हातावर कपूर जाळून अनैसर्गिक सेक्स करत होता. एवढंच नाही विद्यार्थ्यांच्या शरीरावर जळत्या मेणाचे गरम थेंब टाकण्यात आले, त्याचा गाळ आवळून करण्यात आलं. आणि या गोष्टी एकदा नाही तर अनेकदा घडल्या.
या गोष्टींना विद्यार्थ्याने विरोध केला तर त्याला मारहाण केली जायची, जमिनीवर आपटल जायचं. आणि सोशल मीडियावर त्याचे खासजी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जायची. गोष्टी इथपर्यंत थांबल्या नाहीतर आरोपीसोबत त्याची पत्नी सुद्धा यात घाणेरड्या कृत्यात सामील होती.
हे दोघे सुशिक्षित आणि चांगल्या कंपनीत चांगल्यावर पगारावर आहेत. मात्र दोघांकडून या विद्यार्थ्याला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी छळ सुरु होता. त्याला अक्षरशः गुलाम बनवून हे तांत्रिक सेक्स केलं जायचं. तांत्रिक सेक्समध्ये हिप्नोटाईज करून हव्या त्या गोष्टी केल्या जात होत्या. या संपूर्ण घटनेची माहिती विद्यार्थ्याने पोलिसांना दिली असून दोघं पती पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.