esakal | राज्यात कोणतं धरण किती भरलंय? काय आहे परिस्थिती?
sakal

बोलून बातमी शोधा

koyna dam

राज्यात कोणतं धरण किती भरलंय? काय आहे परिस्थिती?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. मात्र, आता आणखी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (low pressure area) निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहतील. तसेच अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची (maharashtra rain) शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याआधीच राज्यातील बहुतांश महत्त्वाची धरणे भरलेली आहेत. काही धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कोणत्या धरणाची काय परिस्थिती आहे, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

 • पुण्यातील भोर तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण आज रविवारी (ता.१२) पहाटे १०० टक्के भरले असून धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाला आणि वीजनिर्मिती केंद्रही सुरु करण्यात आले. रविवारी पहाटे २ वाजता धरण फुल्ल झाले आणि धरणाच्या ४५ स्वयंचलीत दरवाजांपैकी ३ दरवाजे उघडले गेले. पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत राहिली.

 • नाशिकमधील गंगापूर धरणातून रविवारी सायंकाळी आणखी १५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवल्याने (रात्री 10:40) रामकुंड, गांधी तलाव, लक्षमंकुंड, गांधी ज्योत भागात पाणी पातळीत झालेली वाढ. दारणा धरणातून बारा हजार क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. भंडारदरा धरणही भरले असून सांडव्यातून पाणी ओसंडत आहे.

 • रविवार दुपारपासूचा विसर्ग

  धरण : विसर्ग क्युसेसमध्ये

  दारणा : १२ हजार ७८८,

  कडवा : १ हजार ६९६

  वालदेवी : १८३,

  आळंदी : ३०,

  नांदुरमध्यमेश्वर : १३ हजार ४२७,

  गंगापूरर : ५५३

हेही वाचा: इगतपुरीत पावसाची धुवांधार बॅटिंग! २४ तासात झाला ९८ मिमी पाऊस

 • पिंपरीतील खडकवासला धरण साखळीतील टेमघरसह सर्व धरण १०० टक्के भरली आहेत. चार ही एकाच वेळी पहिल्यांदा १०० टक्के झाली आहेत. परिणामी खडकवासला धरणातील विसर्ग रात्री नऊ वाजता सहा हजार ८४८ क्यूसेक करण्यात आला आहे. टेमघर रात्री दहा वाजता १०० टक्के झाले.

 • पानशेत धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी ६०० क्यूसेक तर नदीत ४५१ क्यूसेक पाणी आंबी नदीत सोडले आहे. वरसगाव १००टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून ४४४० क्यूसेक सोडले होते रविवारी रात्री नऊ विसर्ग एक हजार ७७७ क्यूसेक पर्यत कमी केला आहे. धरणातील पाणी मोसे नदीत सोडले आहे. टेमघर धरण रात्री दहा वाजता १०० टक्के झाले आहे. खडकवासला धरणातून नदीत सोडलेल्या पाण्याच्या व्यतिरिक्त कालव्यातून एक हजार १५५ क्यूसेक पाणी शेतीसाठी सोडले आहे.

 • डिंभे धरण ( हुतात्मा बाबू गेनू जलाशय ता.आंबेगाव) सायंकाळी साडेसहा वाजता 95 टक्के भरले. पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून रात्री कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे. नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्यांनी मिळवला पहिला मान

 • पवना धरण शंभर टक्के भरले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. धरणाच्या पातळीमध्येही वाढ होत आहे. पवना धरणातून १३५० क्युसेक प्रमाणे वीजनिर्मिती प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्यात आज रविवारी रात्री आठ वाजता २१०० क्युसेकने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे एकूण ३४५० क्युसेकने विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 • कोयना धरणात सध्या 103.95 टीएमसी पाणी साठा आहे

  - कोयना धरण 105 टीएमसीचे आहे

  - कोयना धरणात सध्या 26 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक

  - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 2. 6 फुटाने उघडले

  - कोयना धरणाच्या दरवाजातून सध्या 22 हजार 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

  - पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

  - कोयना नदीपात्रात 24 हजार 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

loading image
go to top