esakal | इगतपुरीत पावसाची धुवांधार बॅटिंग! २४ तासात झाला ९८ मिमी पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

darana dam

इगतपुरीत पावसाची धुवांधार बॅटिंग! २४ तासात झाला ९८ मिमी पाऊस

sakal_logo
By
विजय पगारे


इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गणपती बाप्पाच्या आगमनापासून आपल्या पारंपरिक शैलीत पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात ९८ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणे ओसंडून वाहत आहेत. दारणा धरणातून बारा हजार क्यूसेसने विसर्ग सुरू आहे. भंडारदरा धरणही भरले असून सांडव्यातून पाणी ओसंडत आहे.

संततधारेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी-घोटी शहरासह व पश्चिम ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजपर्यंत २ हजार ६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात सरासरीकडे वाटचाल सुर केली आहे. सरासरीच्या एकूण ८५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान सलग दोन दिवसांच्या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्ये ही भरीव वाढ झाली आहे.

हेही वाचा: छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

दारणा धरणातून दुपारी तीनपासून १२ हजार ७८८ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे व शाखा अभियंता सुरेश जाचक यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील अतिपावसाच्या भागात सलग चौफेर तुफानी मारा करीत दुसऱ्या टप्यात पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली आहे. दोन दिवसापासून घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चोविस तासात विक्रमी अशी ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यन्त तालुक्यात २ हजार ६०० मिमी पाउस झाला. पावसाची सरासरीकडे सुरूवात केल्याने शेतकरी व जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा: भुजबळ-कांदे यांच्यात पॅचअप; कलेक्टरांच्या मध्यस्थीने मिटला वाद


रविवार दुपारपासूचा विसर्ग

धरण : विसर्ग क्युसेसमध्ये
दारणा : १२ हजार ७८८,
कडवा : १ हजार ६९६
वालदेवी : १८३,
आळंदी : ३०,
नांदुरमध्यमेश्वर : १३ हजार ४२७,
गंगापूरर : ५५३

loading image
go to top