Raj Thackeray Grandson | 'किआन' अमित ठाकरे; राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Grandson
'किआन' अमित ठाकरे; राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?

'किआन' अमित ठाकरे; राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?

राज ठाकरे यांच्या घरातल्या नव्या पाहुण्याला आज ओळख मिळाली आहे. राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या मुलाचा नामकरण सोहळा आज पार पडला. या बाळाचं नाव किआन असं ठेवण्यात आलं. या नावाचा अर्थ काय, हे नाव भारतीय आहे की परदेशी, हेच नाव का निवडलं, असे अनेक प्रश्न या नावाच्या भोवती निर्माण झाले आहेत. तेव्हा जाणून घ्या या नावाचा अर्थ.

राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा मित्र परिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पार पडला. किआन असं या नव्या पाहुण्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात पाच एप्रिल रोजी किआनचा जन्म झाला. अनेकांना किआन हे परदेशी नाव वाटत असलं, तरी किआन हे हिंदू धर्मातलं नाव असल्याचे काही दाखले आढळतात. या नावाचे विविध अर्थ आढळतात.

हेही वाचा: 'शिवतीर्था'वर घुमणार आता 'ही' हाक; राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं!

देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असे या नावाचे अर्थ सांगितले जातात. ज्याची रास मिथुन आणि नक्षत्र मृग आहे, त्यांचं हे नाव ठेवलं जातं. या नावावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या नव्या पाहुण्यामुळे सध्या ठाकरे कुटुंबात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे.

Web Title: What Is The Meaning Of Kiaan Raj Thackeray Grandsons Name

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top