'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी'; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

तुषार सोनवणे
Tuesday, 13 October 2020

महाविकास आघाडीवर भाजपकडून कडाडून टीका केली जात आहे. भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत शिवसेनेवर तीव्र शब्दात टीका केली आहे

मुंबई - राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत भाजपने आज सिद्धिविनायक मंदिरासमोर जोरदार आंदोलन केले. राज्यातही ठिकठिकाणी भाजपनेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. सरकार प्रार्थनास्थळे उघडत नसल्याने महाविकास आघाडीवर भाजपकडून कडाडून टीका केली जात आहे. भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत शिवसेनेवर तीव्र शब्दात टीका केली आहे.

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचे सडेतोड उत्तर; म्हणाले माझ्या हिंदूत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही

कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेत. अयोध्येतील मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा असा अनाहूत सल्ला दिला, भारत तेरे तुकडे होण्याची भाषा करणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसची संगत ज्यांनी केली. दहशतवादी याकुब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री केले. पंढरपूरात जाऊन ज्यांनी पांडुरंगाच्या मुर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी? अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. दारूची दुकाने उघडली, बार रेस्टॉरंट उघडले मग मंदिरे आणि मशिदी बंद का? बार आणि रेस्टॉरंट उघडणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरं बंद ठेवताना लाज वाटत नाही का? अशाही प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे. दरम्यान, आशिष शेलारांनी केलेल्या ट्विटला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What kind of priests of Hindutva This is the helplessness of power Ashish Shelars attack on Shiv Sena