esakal | राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचे सडेतोड उत्तर; म्हणाले माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचे सडेतोड उत्तर; म्हणाले माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने उत्तर देण्यात आले आहे.

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचे सडेतोड उत्तर; म्हणाले माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरि ओम म्हणत मिशन बिगिन अगेन ची घोषणा केली होती. कोव्हिडच्या संसर्गामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हळु हळु उठवण्यात येत आहे. सध्या राज्यात अनेक गोष्टी पुर्वपदावर आलेल्या असताना, प्रार्थनास्थळे मात्र बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने उत्तर देण्यात आले आहे.

हेही वाचा  राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, 'तुम्ही जुनच्या पहिल्या आठवड्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील अनेक गोष्टी सुरू केल्या होत्या. लॉकडाऊनला त्रासलेल्या जनतेला त्या वाक्यामुळे दिलासा मिळाला होता. परंतु त्यानंतर 4 महिन्यानंतरही प्रार्थनास्थळे उघडलेली नाही. एकीकडे बार रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू केल्यानंतरही प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात.राज्याचे मुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेतले होते.तसेच आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन तुम्ही आरतीही केली होती. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की, ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता. तो सेक्युलर शब्द तुम्ही स्विकारला आहे? देशात इतर राज्यातही प्रार्थनास्थळे सुरू झाली आहेत. परंतु त्यामुळे तेथे कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचे ऐकीवात नाही'.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने उत्तर देण्यात आले. त्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की,  'महोदय, आपले प्रार्थनास्थळे उघडण्याबाबतचे पत्र मिळाले. याबाबत सरकार जरूर विचार करीत आहे.जनतेच्या भावना जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे.हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. 

महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला तो योग्यच आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पीओकीची उपमा देणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. आपण सेक्युलर शब्द स्विकारला का असे आपण मला विचारले आहे. तर असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजेच हिंदुत्व असणे असे आहे का? आपण राज्यपाल पदाची शपथ राज्यघटनेनुसार घेतली आहे. त्या घटनेचा गाभा सेक्युलरीझम आहे हे आपणांस मान्य नाही का? आपणास जी शिष्टमंडळे भेटली ती भारतीय जनता पक्षाशी संबधीत आहेत. हा योगायोग असावा, असो, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत सर्व खबरदारी घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेणारच आहे. याची मी ग्वाही देतो'.

हेही वाचा9 कोटींच्या फसवणूकी प्रकरणी शकीलच्या हस्तकाला मुंबईतून अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला जसेच्या तसे उत्तर दिले आहे. राज्यपालांनी हिंदुत्वावर सवाल केल्याने, त्याला उद्धव ठाकरेंकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. त्यात त्यांनी पीओके म्हणणाऱ्यांचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे कंगना रानौतचे राज्यपालांनी केलेले स्वागतावर देखील ठाकरे यांनी पहिल्यांदाच नाराजी दर्शवली आहे.

Chief Minister Uddhav Thackerays reply to Governor Bhagat Singh Kosharis letter

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )