राज्याच्या दक्षिण भागात मे महिन्यातच दाखल झालेल्या मॉन्सूनने दमदार हजेरी लावली आहे. आज (ता. २९) दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.