भारतीय प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10 (1) अंतर्गत कृषी उत्पन्नावरील कर मुक्त आहे. या क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना, धोरणे आणि उपक्रम राबवले आहेत.
Agricultural Income Tax : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील 60 ते 65 टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील 70 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे.