फटाके फोडताना उडालेला तुकडा युवकाच्या लिव्हरमध्ये घुसला, मुंबईतील घटना | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire cracker in human body

फटाके फोडताना उडालेला तुकडा युवकाच्या लिव्हरमध्ये घुसला, मुंबईतील घटना

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: दिवाळीच्या (Diwali) रात्री फेरफटका मारायला जाणं आकाश चौधरी या युवकाला चांगलचं महाग पडलं आहे. इतर लोक फटाके फोडत (Fire crackers) असताना आकाशला झालेली इजा सुदैवाने त्याच्या जीवावर बेतली नाही. चार नोव्हेंबरच्या रात्री आकाश फेरफटका मारायला म्हणून बाहेर पडला होता. त्यावेळी फटाक्याचा एक तुकडा आकाशच्या शरीरात चार सेंटीमीटर आतपर्यंत घुसला होता.

केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन तो तुकडा बाहेर काढला. आकाश नऊ दिवस केईएम मध्ये होता. चार नोव्हेंबरच्या रात्री आकाशने त्याचे फटाके फोडले. त्यानंतर फेरफटका मारण्यासाठी म्हणून तो शेजारच्या गोकुळधाम मार्केटमध्ये गेला. अनेक लोक तिथे फटाके फोडत होते. मध्यरात्रीच्या सुमारास आकाश घरी परतण्यासाठी म्हणून तिथून निघाला. तितक्यात अचानक शरीरात काही तरी घुसल्याचं त्याला जाणवलं. प्रचंड वेदना सुरु झाल्या व छातीतून रक्त येऊ लागले.

हेही वाचा: Video : आवरा! चप्पल दाखवून महिलेने मगरीला लावलं पळवून

चार सेंटीमीटरचा धातूचा तुकडा आकाशच्या शरीरात घुसला व लिव्हरपर्यंत पोहोचला होता. या तुकड्यामुळे नसांना इजा पोहोचू शकली असती, असं डॉक्टरांनी सांगितलं. रक्तस्त्राव सुरु झाल्यानंतर भाऊ त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. शरीरात घुसलेला धातूचा तुकडा लिव्हरपर्यंत पोहोचला होता.

हेही वाचा: मालेगाव हिंसाचार : एका बड्या नेत्याच्या भावाचा शोध सुरू

कुपरच्या डॉक्टरांनी ट्युब टाकून छातीत जमा झालेलं पाणी काढलं व केईएमला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हा तुकडा काढला. आकाश चौधरी मूळचा उत्तर प्रदेशचा असून मागच्या तीन वर्षांपासून तो मुंबईत आहे.

loading image
go to top