esakal | ...जेव्हा शरद पवार कोण नवनीत राणा असा प्रश्न करतात?
sakal

बोलून बातमी शोधा

When Sharad Pawar asked who is Navneet rana

खासदार नवनीत राणा यांनी असा सल्ला दिला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सरकार बनवावे, यावर तुमचे मत काय असे विचारले असता शरद पवारांनी प्रतिप्रश्न केला, नवनीत राणा कोण?

...जेव्हा शरद पवार कोण नवनीत राणा असा प्रश्न करतात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिल्ली: खासदार नवनीत राणा यांनी असा सल्ला दिला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सरकार बनवावे, यावर तुमचे मत काय असे विचारले असता शरद पवारांनी प्रतिप्रश्न केला, नवनीत राणा कोण?

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्यावर पत्रकारांनी त्यांना सांगितले की, नवनित राणा या आपल्या पक्षाच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यावर शरद पवार पुन्हा म्हणाले, मग त्या काय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्टॅटेजी ठरवणार काय? 

फेसबुक, ट्विटरला तगडी टक्कर; ‘डब्लूटी’ सोशल मीडियातला नवा भिडू

पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत प्रश्नांचा भडिमार केला. पण शरद पवार यांनी राज्यात सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चाच झाली नाही, असा गुगली टाकला.

पवार-सोनिया बैठकीनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम; पवार काय म्हणाले?

एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बैठका कां घेतल्या असे विचारले असता श्री. पवार म्हणाले, वेगवेगळ्या पक्षांचे आमदार एकमेकांना भेटत असतात. ती अनौपचारिक भेट होती. ती किमान समान कार्यक्रमासाठी नव्हती. 

महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार; राऊत यांचा पुनरुच्चार

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका दोन दिवस कशासाठी झाल्या, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, ज्यांच्याकडे बहुमत आहे ते सरकार का बनवत नाहीत, याबाबत आमचे नेते चर्चा करत होते.