esakal | महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार; राऊत यांचा पुनरुच्चार

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut-Shivsena

राज्यात लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट हटवून लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे यावर आमचे एकमत आहे.

महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार; राऊत यांचा पुनरुच्चार
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतरही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकार स्थापनेचा विषय पुढे सरकला नाही. पण, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिलीय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राऊत यांनी सोमवारी (ता.18) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना पत्रकारांनी गराडा घातला.

- 'शबरीमला'च्या दानपेटीत 'इतक्या' कोटींचे दान; महसुलात दुपटीने वाढ!

त्यावेळी राऊत म्हणाले, 'शरद पवार यांच्याशी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर चर्चा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत तुम्ही पंतप्रधानांची भेट घेऊ शकाल का?, अशी विनंती मी त्यांना केली. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्ठमंडळ पंतप्रधानांना भेटण्यासंदर्भातही चर्चा झाली. शरद पवार हे आमचे नेते आहे. त्यांची भेट घेणं हे माझं नित्याचं काम आहे. आजही मी त्यांची भेट घेतली.' 

- शरद पवार-सोनिया गांधी यांच्यात प्रदीर्घ चर्चा; अजित पवारही दिल्लीत दाखल?

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीबाबत संजय राऊत म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र आघाडी आहे. आमचा पक्ष वेगळा आहे. आता त्यांच्या चर्चेबाबत मी कसे उत्तर देऊ? त्यांच्या बैठकीबाबत मी शरद पवार यांच्याशी काहीही बोललो नाही. चर्चा पुढे सरकरली असेल तर, तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल. राज्यात लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट हटवून लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे यावर आमचे एकमत आहे.' सर्वांत शेवटी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

- पवार-सोनिया बैठकीनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम; पवार काय म्हणाले?