भरारी पथके कोठे आहेत? सोलापूर जिल्ह्यात २ पथकांकडून ५ परीक्षार्थींवर कॉपीप्रकरणी कारवाई; दहावीच्या पहिल्याच पेपरला १००७ विद्यार्थी गैरहजर

इयत्ता बारावीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (एमसीव्हीसी) इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर आज (शुक्रवारी) उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्या भरारी पथकाने कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली. दुसरीकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला मराठीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला.
copy case in solapur
copy case in solapuresakal

सोलापूर : इयत्ता बारावीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (एमसीव्हीसी) इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर आज (शुक्रवारी) उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्या भरारी पथकाने कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली. दुसरीकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला मराठीचा पेपर कॉपीमुक्त पार पडला. तत्पूर्वी, प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा ‘एमसीव्हीसी’चा पेपर होता. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव केंद्रावर अचानक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांचे भरारी पथक पोचले. त्यावेळी एका विद्यार्थ्याने खिडकीत पुस्तकच ठेवल्याचे दिसून आले. दुसरीकडे एका विद्यार्थिनीने कपड्यात उत्तराची दहा पाने लपवून ठेवली होती. त्या दोन्ही विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल पुणे बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर कॉपी करून उत्तरे लिहायला सुरू असल्याच्या तोंडी तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. पण, भरारी पथके त्याठिकाणी जात नसल्याने विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यास संधी मिळत असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत कुर्डुवाडी (ता. माढा) येथील भिसे कॉलेज, मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय, माळशिरसमधील पिराळे ज्यु. कॉलेज व आता अक्कलकोटमधील चपळगाव अशा चार केंद्रांवरील पाच विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांसह महसूलची पथके कागदावरच?

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल अधिकाऱ्यांची पथके नेमल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा परिषदेनेही तसेच सांगितले. दहावी-बारावीच्या परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी कागदोपत्री एकूण ४६ भरारी पथके नेमली. पण, अनेक पथके परीक्षा केंद्राकडे फिरकलीच नाहीत, अशी चर्चा आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांची बदली झाल्यापासून अशी स्थिती आहे. पुणे, नगर या जिल्ह्यात कॉपी केसेस आढळत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र एक-दोन पथकाकडूनच कारवाई होत आहे. आतापर्यंत कॉपी करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर कारवाई झाली असून त्यात उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांच्या पथकानेच चार कारवाया केल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेला एक हजार विद्यार्थी गैरहजर

इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरु झाली. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर ५४ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १२ दिव्यांग विद्यार्थीही या परीक्षेसाठी हजर होते. मराठी विषयाचा पहिला पेपर कॉपीविना पार पडला. या परीक्षेला एक हजार सात विद्यार्थी गैरहजर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com