कवठ्याच्या सरपंच ‘भाभी’ गेल्या कुठे? आठव्या दिवशीही पोलिस रिकाम्या हाताने परतले

कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या महिला सरपंच जैतुनबी शेख (वय ६०) या बुधवारी (ता. ७) शेळ्या चारायला गेल्यावर भरदुपारी साडेबाराच्या सुमारास शेतातून अचानक बेपत्ता झाल्या. आठ दिवस झाले, पण शोध लागलेला नाही.
महिला सरपंच जैतुनबी शेख बेपत्ता
महिला सरपंच जैतुनबी शेख बेपत्ताsakal

सोलापूर : कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या महिला सरपंच जैतुनबी शेख (वय ६०) या बुधवारी (ता. ७) शेळ्या चारायला गेल्यावर भरदुपारी साडेबाराच्या सुमारास शेतातून अचानक बेपत्ता झाल्या. आठ दिवस झाले, पण त्यांचा शोध पोलिसांना लागलेला नाही, हे विशेष.

शहरातील जवळपास ११ लाख लोकसंख्येसाठी सात पोलिस ठाणी आहेत. दाखल गुन्ह्यांचे प्रमाण आणि पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या, यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे पहिल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या गुन्ह्यांचा तपास आलाच, अशी पोलिस दलातील अवस्था आहे. पण, सध्या शहरात दुचाकी चोरी, घरफोडीचे प्रकार पूर्णपणे बंद झालेले नाहीत. दुसरीकडे मटका, जुगार सुरुच आहे. वाहतूक कोंडीची समस्या पण सुटलेली नाही. चोरी झालेल्या ठिकाणच्या नागरिकांनी रात्र गस्तीची मागणी करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे तेथील नागरिक सांगतात. दुसरीकडे अनेक गुन्ह्यातील संशयित आरोपींचा तपास लागलेला नाही. कौटुंबिक हिंसाचार तथा सासरी महिलांचा छळ वाढला आहे. त्यात आता कवठे गावच्या सरपंच भाभीचा विषय जिल्ह्यातच नव्हे, जिल्ह्याबाहेरही चर्चेत आहे. त्यांना शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. पण, आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सरपंच भाभी नेमक्या गेल्या कुठे, याचा तपास पोलिसांना अजून लागलेला नाही.

बुधवारी अधिकाऱ्यांसह २८ जणांनी घेतला शोध

सरपंच भाभी बेपत्ता होऊन आठ दिवस लटले, तरीपण पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीत. त्या मोबाइल वापरत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. डॉग स्कॉडची मदत घेतली, घराची झडती घेतली, पण काहीच मिळाले नाही. गावातील व कुटुंबातील लोक सांगतात, सरपंच भाभी स्वभावाने गरीब होत्या, त्यांचे कोणाशीच भांडण नव्हते. त्यामुळे अचानकपणे गायब झालेल्या सरपंच नेमक्या गेल्या कुठे, हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. बुधवारी (ता.१४) सहायक पोलिस उपायुक्त माधव रेड्डी, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, उपनिक्षक सचिन मंद्रूपकर यांच्यासह गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे आणि दहा पोलिस अंमलदार व आरसीपीचे १५ पोलिस कर्मचाऱ्यांनी सरपंच भाभी ज्या परिसरात शेळ्या राखत होत्या, तो परिसर तपासला. पण, त्याठिकाणी काहीच मिळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सात महिन्यानंतरही ‘त्या’ खुनाचा तपास नाही

एमआयडीसी परिसरातील एका जेष्ठ महिलेचा त्यांच्या राहत्या घरात फेब्रुवारी २०२२ मध्ये खून झाला होता. तत्कालीन अधिकाऱ्यांनी खुनाचा तपास केला. त्यासाठी विशेष पथकाची मदत घेण्यात आली. आता काही दिवसांपूर्वी तो तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पण, सात महिने होऊनही त्या वयस्क महिलेचा खून कोणी व कशासाठी केला होता, याचा तपास लागलेला नाही, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com