Ajit Pawar : दौरे रद्द, कार्यक्रम रद्द; अजित पवारांचं चाललंय काय? स्वतः ट्वीट करत दिली माहिती

अजित पवार भाजपासोबत जाण्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. त्यानंतर पवारांनी हे ट्वीट केलं आहे.
NCP Ajit Pawar
NCP Ajit Pawaresakal
Updated on

Maharashtra Politics : अजित पवारांचं नक्की चाललंय काय? हा प्रश्न सध्या राज्याला पडला आहे. अचानक दौरे रद्द करणं, नॉट रिचेबल होणं, यामुळे अजित पवार आता पुन्हा बंड करणार, भाजपासोबत युती करणार, अशा अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अजित पवारांनी एक ट्वीट करत आपल्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे.

अजित पवारांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये अजित पवार म्हणाले, "सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे." (Latest Marathi News)

NCP Ajit Pawar
Ajit Pawar : शरद पवार पुण्यात अन् राष्ट्रवादीचे आमदार निघाले मुंबईला? बनसोडे यांनी फोडलं गोड गुपित

मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

NCP Ajit Pawar
Ajit Pawar यांनी दिवसभरातले कार्यक्रम केले रद्द, राजकीय घडामोडींना वेग

खारघरमध्ये रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो, असं अजित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com