जेथे रस्ता तेथे लालपरी! ५ वर्षाच्या चिमुकल्यापासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठांसाठी काय आहेत सवलती, नक्की वाचा

‘आरामदायी व सुखकारक प्रवास’ हे एसटीचे ब्रिदवाक्य आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, लालपरी वेळेनुसार गावोगावी पोचतेच. त्यामुळे दिवसेंदिवस आता लालपरीचे प्रवासी वाढत आहेत. ‘वाट पाहिन पण लालपरीनेच जाईन’ म्हणणाऱ्या महिलांची संख्या आता वाढली आहे.
ST Bus journey will knows on the app
ST Bus journey will knows on the appsolapur

सोलापूर : ‘जेथे रस्ता तेथे बस’अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास आठशे गावांपर्यंत लालपरीची सेवा पोचली आहे. जिल्ह्यातील नऊ आगाराच्या माध्यमातून दररोज ६५० बसगाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. दररोज जिल्ह्यातील सरासरी दोन लाख प्रवासी लालपरीतून प्रवास करतात. महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर दररोज ६५ ते ७० हजार महिला प्रवाशी वाढले आहेत. सवलतीच्या निर्णयानंतर ३३ टक्के महिला प्रवाशी वाढले आहेत.

जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे नऊ डेपो आहेत. सोलापूर, बार्शी, अकलूज, सांगोला, पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा व कुर्डुवाडी अशा डेपोंचा त्यात समावेश आहे. स्थानिक प्रवाशांसाठी सोलापूर विभागाच्या माध्यमातून पंढरपूर-सोलापूर, पंढरपूर-टेंभूर्णी, पंढरपूर-सांगोला, बार्शी-सोलापूर, मोहोळ-सोलापूर, सोलापूर-अक्कलकोट अशा शटल सेवा सुरु आहेत. स्थानिक प्रवाशांसाठी दररोज ३५० बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत.

सोलापूर विभागाअंतर्गत दररोज ६५७ बसगाड्या प्रवाशांची सेवा करीत आहेत. ‘आरामदायी व सुखकारक प्रवास’ हे एसटीचे ब्रिदवाक्य आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, लालपरी वेळेनुसार गावोगावी पोचतेच. त्यामुळे दिवसेंदिवस आता लालपरीचे प्रवासी वाढत आहेत. ‘वाट पाहिन पण लालपरीनेच जाईन’ म्हणणाऱ्या महिलांची संख्या आता वाढली आहे. लालपरीच्या प्रवाशांची संख्या वाढीसाठी ठोस नियोजन केले जात असल्याची माहिती विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी सांगितले.

‘एसटी’ बसगाड्यांमधील प्रवाशांसाठी सवलती...

  • - ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास

  • - महिलांना राज्यभरातील प्रवासासाठी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत

  • - पाचवी ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थींनींना मासिक पास मोफत

  • - ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत

  • - ५ ते १२ वर्षांपर्यंत चिमुकल्यांना एसटी प्रवासात अर्धेच तिकीट काढावे लागते

पुढच्या महिन्यात सोलापूर-पुणे ई-बससेवा

सोलापूर ते पुणे या मार्गावर आगामी काही दिवसांत ईलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार आहे. सोलापूर बस डेपोतील चार्जिंग स्टेशनचे काम आता पूर्ण झाले असून किरकोळ काम राहिले असून ते पूर्ण झाल्यानंतर ही बससेवा सुरु होणार आहे. त्यानंतर पंढरपूर-पुणे, मंगळवेढा-सोलापूर, मंगळवेढा-पुणे अशा मार्गांवरही ईलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर पर्याय म्हणून ईलेक्ट्रिक बससेवेकडे पाहिले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com